'चला कोकण' - ध्येय आणि उद्देश्य
मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ हे वर्ष ''Visit Maharashtra'' म्हणुन जाहीर केले आहे.
पर्यटनात आणि निसर्गसौंदर्यात कोकण हे गोव्यापेक्षाही सरस असून त्यामुळेच कोकणात पर्यटन विकासाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कायापालट घडवण्यासाठी स्वतंत्र ‘कोकण पर्यटन विकास महामंडळ’ स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच विधानसभेत केली. कोकणचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी पर्यटन उद्योगाला चालना देण्याबरोबरच मुंबई-गोवा हायवे रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावणे, सागरी किनार्यांचा आणि बंदरांचा विकास करून त्याद्वारे स्थानिक तब्बल १ लाख तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मा. मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला आणि कोकण विकासाला चालना देण्यासाठी आम्ही ''चला कोकण'' ह्या Mobile Application आणि Website माध्यमातुन आमची वैज्ञानिक जोड देत आहोत. कोकण पर्यटन संदर्भातील जवळपास सर्वच माहिती एका क्लिक सरशी पर्यटकांना उपलब्ध होईल.
ही माहिती तीन मुख्य गटात विभागली आहे. १. राहण्याची व्यवस्था, २. खाणे-पिणे, ३. प्रवास
१. Reside (राहण्यासंदर्भातील सर्व माहिती - लॉजिंग, अपार्टमेंट, ३ स्टार, ५ स्टार, ७ स्टार व साधारण हॉटेल्स)
२. Eat (नाश्ता, भोजन देणारी हॉटेल्स व रेस्तराँ, घरपोच सुविधा, तसेच इतर खाण्यापिण्या संदर्भातील महत्त्वाची केंद्रे, फळ-फळावळ, फळ प्रक्रिया, सरबत, ओले व सुके सागरी मासे इ.)
३. Travel (सर्व प्रकारची वाहनांची व्यवस्था, पर्यटन मार्गदर्शन, सुरक्षा इ.)
''चला कोकण'' - प्रमुख ध्येय आणि उद्देश्य
१. ह्या आधुनिक माध्यमातुन अधिकाधिक देशी-विदेशी पर्यटकांना कोकणच्या नंदनवनात पर्यटन करण्याच्या दृष्टीने आकर्षित करण्यास आम्ही हातभार लावणार आहोत.
२. पर्यटनादरम्यान राहण्याची व्यवस्था, खाणे-पिणे व प्रवाससंदर्भातील अधिकाधिक माहिती पर्यटकांना सुलभपणे मिळणार असल्यामुळे त्यांचा अनुभव आनंददायी ठरेल व ते पुन्हा पुन्हा येतील.
३. ह्या माध्यमामुळे वरील तीन क्षेत्रातील सर्वच लहानमोठ्या व्यावसायिकांच्या व्यवसायांना चालना मिळेल व तेथील कामगारांच्या प्रगतीलाही हातभार लागेल.
४. ह्या माध्यमामुळे वरील तीनही क्षेत्रात व त्यासंबधित इतर क्षेत्रात नवनवीन रोजगार निर्माण होतील.
५. पर्यटन उद्योगाला चालना मिळाल्यामुळे महसुल वाढुन कोकणाच्या सर्वांगिण विकासाला हातभार लागेल.
६. परदेशी पर्यटकांच्या माध्यमातुन देशाला परकीय चलन मिळेल.