"कोकण" म्हणजे ''स्वर्गभूमी''...
अप्रतिम नैसर्गिक सौंदर्याचा नजराणा...!
भारताचा पश्विम किनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री पर्वतरांग यांच्या मधे असलेला भूमीचा पट्टा महाराष्ट्रात व गोव्यात ''कोकण'' म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्राच्या सहा प्रशासकीय विभागांपैकी कोकण विभाग हा एक आहे. या विभागात सहा जिल्हे व ७२० कि.मी लांबीच्या किनारपट्टीचा समावेश होतो.
कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. महाराष्ट्राच्या भूमीवरील अतिशय सुंदर, नयनरम्य परिसर लाभलेले, जैविक विविधतेच्या बाबतीत अग्रेसर, निसर्गाने भरभरून दिलेले एक अतिशय सुंदर ठिकाण म्हणजे कोकण. नारळी-पोफळीच्या बागा, माडांच्या राया, आंबे, सुपारी, केळीच्या बागा, फणस, काजू, कोकमाची झाडं आणि डोंगर उतारांवर केलेली भात शेती... नयनरम्य समुद्र किनारे, गडकिल्ले, सागरीदुर्ग... यातून खुलणारे कोकणचे सौंदर्य पाहण्याबरोबरच कोकणचा इतिहास, संस्कृती, परंपरा, खाद्यसंस्कृती आदींची अनुभूती घेण्यासारखे दुसरे सुख नाही. निसर्गाचा हा असा मुक्त वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. मराठी साहित्य आणि सिनेमा मध्ये देखील कोकणातील निसर्गाचे, संस्कृती-परंपरांचे अतिशय सुंदर वर्णन आले आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही या कोकण पट्ट्यातच स्थित आहे.
अशा ह्या निसर्गरम्य-समृध्द कोकणचा ''केलिफोर्निया'' करण्याचे स्वप्न या भूमीतील जनतेला यापूर्वी अनेकांनी दाखविले आहे. हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न चालू आहेत. कोकणच्या विकासाला चालना व गती देण्याचा आमचाही निश्चय आहे.

No comments:
Post a Comment